बेड्यासह खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरार 

गौरव साळुंके 
Sunday, 26 July 2020

सोन्याच्या दागिन्यांवरुन झालेला वादातुन झालेल्या खुन प्रकरणातील दोघे संशयित आरोपी बेड्यासह पोलिसांच्या ताब्यातुन फरार झाल्याची घटना येथे घडली. 

श्रीरामपूर (अहमदनगर) : सोन्याच्या दागिन्यांवरुन झालेला वादातुन झालेल्या खुन प्रकरणातील दोघे संशयित आरोपी बेड्यासह पोलिसांच्या ताब्यातुन फरार झाल्याची घटना येथे घडली. 

पोलिसांनी सिसगाव शिवारात त्यातील एकाला पकडले असुन दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध सुरु आहे. खुनाच्या गुन्ह्यात सचिन काळे (रा. मुठेवाडगाव) व भौदू भोसले (रा.कानडी, ता. आष्टी) हे दोघे न्यायालयीन कोडठीत आहेत. त्यांचे रात्री पोट दुखु लागल्याने त्यांना पोलिसांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले होते. तेथे त्यांनी पोलिसांच्या हाताला हिसका देवुन धुम ठोकली.

पोलिसांनी पाठलाग करुन भोसले याला सिरसगाव शिवारात बेडीसह पकडले. तर काळे खानापूर शिवारात पसार झाल्याचे समजते. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पोलिस पथके रवाना झाले असुन शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. 

हेही वाचा : हाथी चलता हैं... कुत्ता भुकता है! 
मुठेवाडगाव शिवारात 8 मार्च 2020 रोजी मध्यरात्री लोंखडी पाईप व तलवारीने वार करुन मयुर काळे (वय 28) याचा खुन झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. वडिलांच्या निधनानंतर मुलीने पतीला माहेरी आणून आईसोबत राहणे पसंत केल्यामुळे मयुर हा पत्नीसमवेत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे राहत होता. काही दिवसांनंतर आईने गावातीलच सचिन काळे याच्यांशी दुसरा विवाह करुन मुलीला सोडले. 
मुलीकडे असलेल्या दागिन्याच्या मागणीसाठी आईने पती सचिन याला मित्रांसोबत मुलीकडे पाठविले. त्यावेळी सचिन, भोसले, संदिप काळे, सुरज काळे (रा. भेंडाळा, ता. गंगापूर) हे मयुरकडे गेले. तेथे त्यांनी मयुर व पत्नी मोनिकाकडे दागिन्याची मागणी केली. याप्रसंगी चौघेंही सर्व दारुच्या नशेत असल्याने वाद झाला. त्यात मयुरला गंभीर मारहाण झाल्याने तो मरण पावला. मारहाणीत मोनिकाही जखमी झाली. वाद सोडविण्यासाठी पुढे आलेला मयुरचा भाऊ तैमुर काळे त्यांचे घर अरोपींनी पेटविले होते. 

मोनिका हिने दिलेल्या फिर्यादिवरुन तालुका पोलिसांनी सचिन, संदिप, सुरज व भोसले विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी शोध घेवून सचिन, सुरज व भौदू याला गजाआड केले होते. यापुर्वीही ग्रामीण रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील एका आरोपीसा उपचारासाठी आणले असता त्यानेही पोलिसांची नजर चुकवुन धुम ठोकली होती. गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातुन कसे पसार होतात. याची वरिष्ठांनी चौकशी करण्याची गरज आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused escaped from the custody of the police in Shrirampur taluka