पाच वर्षांपासून पोलिसांना दिला गुंगारा; अखेर आरोपी जेरबंद

The accused, who has been absconding for the last five years in Ahmednagar, has been arrested by the police
The accused, who has been absconding for the last five years in Ahmednagar, has been arrested by the police

अहमदनगर : चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटल्याच्या प्रकरणातील, मागील पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले. अविनाश रामू बीडकर (रा. भारस्कर कॉलनी, लाल टाकी, नगर) असे त्याचे नाव आहे.

अवैध घरगुती सिलेंडर साठ्यावर छापा; गुन्हा दाखल
 
अविनाश बाळासाहेब शिरसाठ (रा. भगवानबाबा चौक, सावेडी) हे 23 नोव्हेंबर 2017 रोजी दुचाकीवरून खाकीदास बाबा मठ- जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत रस्त्याने जात होते. तिघांनी पाण्याच्या टाकीजवळ चाकूचा धाक दाखवून मोटरसायकल व रोख रक्कम, असा 31 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

बीडकर गुन्हा घडल्यापासून फरार होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यास बुधवारी (ता. 17) लाल टाकी परिसरात सापळा लावून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, सागर ससाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com