esakal | महापालिकेची वसुली जोमात

बोलून बातमी शोधा

The action of recovery department in ward committee four of Ahmednagar Municipal Corporation is underway}

पथक दाखल होताच त्यांच्या हातात रुग्णालय प्रशासनाने 4 लाख 30 हजार रुपयांचा धनादेश दिला. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

महापालिकेची वसुली जोमात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग समिती चारमधील वसुली विभागाची कारवाई जोमात सुरू आहे. वसुली पथकाने बुधवारी क्‍लेरा ब्रूस शाळेच्या कार्यालयास टाळे ठोकून जप्तीची कारवाई केली. तसेच, श्री आई तुळजाभवानी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून 4 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी वसुली झाली. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

प्रभाग समिती चारमधील अधिकारी नानासाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली सतीश पुंड, राजू सराईकर, दीपक घेवारे, राजेंद्र म्हस्के, शिवराम गवांदे, बाळासाहेब सुपेकर, रमेश कोतकर आदींनी ही कारवाई केली. क्‍लेरा ब्रूसकडे 1 लाख 21 हजार 42 रुपयांचा मालमत्ताकर थकीत आहे. वेळोवेळी नोटिसा बजावूनही कर न भरल्याने पथकाने बुधवारी त्यांच्या कार्यालयास टाळे ठोकले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

त्यानंतर पथकाने नवीन टिळक रस्त्यावरील श्री आई तुळजाभवानी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाकडे मोर्चा वळविला. पथक दाखल होताच त्यांच्या हातात रुग्णालय प्रशासनाने 4 लाख 30 हजार रुपयांचा धनादेश दिला. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.