नगर तालुक्यात दक्षता पथकांची ३४ गावांत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

नगर तालुक्यात दक्षता पथकांची ३४ गावांत कारवाई

नगर : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे तहसीलदार उमेश पाटील यांनी आठ दक्षता पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांनी रविवारी तालुक्यातील ३४ गावांत नियमांची पायमल्ली करणारांवर दंडात्मक कारवाई केली.

तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, गावांमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर, दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या, वेळेचे पालन न करणाऱ्या आस्थापना, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा. विलगीकरणात दाखल केलेल्या गावातील नागरिकांची खात्री करावी. विलगीकरण कक्षात न राहणाऱ्यांची माहिती ग्रामसुरक्षा दलाला द्यावी. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश तहसीलदार पाटील व गटविकास अधिकारी सचिन धाडगे यांनी या पथकांना दिले होते.

या पथकांनी रविवारपासून (ता. १) तालुक्यात कारवाईस सुरवात केली आहे. ३४ गावांमधून ३२ हजार ४०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यात नागरदेवळे, बुऱ्हाणनगर, वडारवाडी, दरेवाडी, वाकोडी, पिंपळगाव माळवी, जखणगाव, हिंगणगाव या प्रमुख गावांचा समावेश आहे. आगामी काळात ही कारवाई सुरूच राहील, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: कन्येने केले ६० वर्षीय पित्याचे ‘शुभमंगल’; विधिवत पार पडला सोहळा

Web Title: Action Taken By Vigilance Teams In 34 Villages In Ahmednagar Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagar
go to top