esakal | कन्येने केले ६० वर्षीय पित्याचे ‘शुभमंगल’; विधिवत पार पडला सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

कन्येने केले ६० वर्षीय पित्याचे ‘शुभमंगल’; विधिवत पार पडला सोहळा

sakal_logo
By
शांताराम जाधव

बोटा (जि. नगर) : एक वर्षापूर्वी आईचे निधन झाले. तिचा विवाह झाल्याने ती सासरी गेली. त्यामुळे पित्याच्या वाट्याला आलेलं एकटंपण त्रासदायक होऊ लागले. त्यांना आधाराची गरज असल्याचे ओळखून कन्येने स्वतःच्या ६० वर्षीय पित्याचे शुभमंगल करण्याचा निर्णय घेतला आणि अंमलातही आणला. ही सुखद घटना संगमनेर तालुक्याच्या शिंदोडी येथे घडली. शिंदोडीतील ६० वर्षीय पित्याचे नाव आहे तबाजी चिमाजी कुदनर व त्यांना जीवनाच्या सरत्या काळात साथ देणाऱ्या ४० वर्षीय सहचारिणीचे नाव सुमन तबाजी कुदनर आहे. (girl arranged the marriage of her 60-year-old father)

६० वर्षीय तबाजी चिमाजी कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एक वर्षापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर मुलीचेही लग्न झाले. त्यामुळे घरात ते एकटेच राहिले. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होतं होते. त्यात शेती व जनावरेही संभाळण्याची त्यांची ताकद कमी होत चालली होती. त्यांच्या एकटेपणावर उपाय म्हणून मुलगी सरिता बाचकर व मित्रपरिवाराने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. सुरूवातीला समाज काय म्हणेल. हे काय लग्नाचे वय आहे आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे त्यांनी नकारच दिला. मात्र मित्रपरिवार आणि मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आणि राहुरी तालुक्यातील शिंगवे गावातील ४० वर्षीय सुमनबाईंसोबत केवळ आठ ते दहा वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत विधिवत लग्न केले.

सुमनबाई यांनीही आपल्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न करत असल्याचे सांगितले. मी या लग्नापासून आनंदित आहे, असंही सुमनबाई म्हणाल्या. आयुष्याच्या अशा टप्प्यावर पुन्हा या दोघांना जोडीदार मिळाल्याने दोघेही आनंदाने जीवनाची दुसरी इनिंग सुरू केली आहे. या शुभकार्यासाठी अशोक बाचकर, भीमराव कुदनर, सहादू गायकवाड, बबन गायकवाड यांनी पुढाकार घेतला.

(girl arranged the marriage of her 60-year-old father)

हेही वाचा: 'होय, विधानसभा निवडणूक लढणार' - अनुराधा नागवडे

loading image
go to top