श्रीरामपुरातील विनापरवाना फलकांवर कारवाई

गौरव साळुंके
Tuesday, 8 December 2020

पालिकेच्या संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज ही कारवाई केली. तसेच पुढील काळात शहरातील विविध भागात वाढलेले अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

श्रीरामपूर ः येथील पालिकेने शहर परिसरातील विविध ठिकाणीचे विनापरवाना असलेले फलके आज हटवून संबधीतांवर कारवाई केली. शहर परिसरात विविध रस्त्यासह अनेक भागात विनापरवाना उभारलेली फलके मोठ्या प्रामाणात वाढले होते.

त्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रम वाढले असून अतिक्रम नियंत्रणासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सय्यद बाबा चौक, गोंधवणी परिसर, अक्षय कॉर्नर परिसर, भगतसिंग चौक, गिरमे चौक, नॉर्दन ब्रॅन्च परिसरात असलेले फलके हटविले आहेत.

पालिकेच्या संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज ही कारवाई केली. तसेच पुढील काळात शहरातील विविध भागात वाढलेले अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on unlicensed billboards in Shrirampur