
अहिल्यानगर : महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने १२ जणांच्या विरूद्ध फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.