
टँकरच्या प्रस्तावास विलंब केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
पाथर्डी ः तालुक्यात काही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित गावांतील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी टॅंकरचे प्रस्ताव तत्काळ पंचायत समितीस न पाठविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड यांनी दिला आहे. (Action will be taken if the tanker's proposal is not submitted soon)
हेही वाचा: अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी
टंचाईच्या पार्श्वभूमीवर सभापती दौंड यांनी तालुक्यातील सर्व गावांतील सरपंच व ग्रामसेवकांना लेखी स्वरूपात सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील वाड्या-वस्त्यांवर पाहणी करून जेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल, तेथील टॅंकरचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून पंचायत समितीकडे सादर करावेत.
संबंधित गावांतील ग्रामसेवकांनी टंचाई काळात कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याच्या परिस्थितीची पाहणी करून प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावेत. कोरोनाच्या भीषण संकटात पाण्यासाठी ग्रामीण जनतेचे हाल होता कामा नये.
या बाबत दक्षता घ्यावी. गाव, वाडी-वस्तीवर पाण्याची समस्या जाणवत असेल, तर ग्रामस्थांनी तत्काळ पंचायत समिती प्रशासन अथवा पंचायत समितीचे सभापती, उपसभापतींकडे संपर्क साधावा, असे आवाहनही दौंड यांनी केले आहे. (Action will be taken if the tanker's proposal is not submitted soon)
Web Title: Action Will Be Taken If The Tankers Proposal Is Not Submitted
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..