esakal | बेलापूर शिवारातील व्यावसायिक बेपत्ता; अपहरणाची चर्चा, पोलिसांकडून शोध सुरू

बोलून बातमी शोधा

 Adat businessman Gautam Jhumbarlal Hiran from Belapur has been missing since Monday evening}

गौतम हिरण अचानक बेपत्ता झाल्याने ग्रामस्थ व हिरण कुटुंबीयांनी रात्री पोलिस ठाण्यात धाव घेतली. हिरण यांचा शोध घेण्याची मागणी केली. चारचाकी वाहन हिरण यांना घेऊन श्रीरामपूरकडे गेल्याचे समोर आले.

ahmednagar
बेलापूर शिवारातील व्यावसायिक बेपत्ता; अपहरणाची चर्चा, पोलिसांकडून शोध सुरू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील बेलापूर येथील अडत व्यावसायिक गौतम झुंबरलाल हिरण हे सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. सोमवारी सायंकाळी गोदामातून हिशेबाच्या वह्या, रोख रक्कम घेऊन दुचाकीवरून घरी जाताना, बेलापूर बाह्यवळण रस्त्यावर त्यांना बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून नेल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे हिरण यांचे अपहरण झाल्याची चर्चा आहे.
 
दरम्यान, मंगळवारी दुपारी बेलापूर पोलिस ठाण्यात व्यापारी व पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन हिरण यांचा शोध सुरू केला आहे. बेलापूर-श्रीरामपूर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गौतम हिरण अचानक बेपत्ता झाल्याने ग्रामस्थ व हिरण कुटुंबीयांनी रात्री पोलिस ठाण्यात धाव घेतली. हिरण यांचा शोध घेण्याची मागणी केली. चारचाकी वाहन हिरण यांना घेऊन श्रीरामपूरकडे गेल्याचे समोर आले.

सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारले अन...
 
दरम्यान, हिरण यांची दुचाकी किल्लीसह श्रीरामपूर-बेलापूर बाह्यवळण रस्त्यावर आढळली. दुचाकीला हिशेबांच्या वह्यांची पिशवी मिळाली. याबाबत पंकज झुंबरलाल हिरण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी हिरण बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.