

श्रीरामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक व माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्ष संघटना, विविध विकास कामे व श्रीरामपुरातील राजकीय घडामोडींसंदर्भात चर्चा केली.