
अहिल्यानगर : लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील आदिवासी पारधी समाजाचे लोक अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर राहात आहेत. त्यांना कायमस्वरूपी करून गायरान जमीन नावावर करून देण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.