esakal | कोरोनाबाधित रुग्ण शोधण्याकडे प्रशासनाचा कल
sakal

बोलून बातमी शोधा

Administration's tendency to find coronary artery disease

संगमनेर तालुक्यात प्रशासनाने रुग्णसंख्येला महत्व देण्यापेक्षा बाधित रुग्ण शोधण्याकडे लक्ष्य केंद्रीत केले आहे.

कोरोनाबाधित रुग्ण शोधण्याकडे प्रशासनाचा कल

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यात प्रशासनाने रुग्णसंख्येला महत्व देण्यापेक्षा बाधित रुग्ण शोधण्याकडे लक्ष्य केंद्रीत केले आहे. या अंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून चाचण्यांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याने दोन हजार 956 ची संख्या गाठली आहे.

प्रशासनाने या चाचण्यांची सुरवात शासकिय विभागातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांपासून केली. संगमनेरच्या महसूल विभागातील पोलिस पाटलांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. यातून दोन पोलिस पाटलांसह 72 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दोन तिन दिवसांत रुग्णसमोर येण्याचा वेग काही प्रमाणात घटला, मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा चाचण्यांचा वेग वाढल्याने शहरासह तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची गतीही वाढली आहे. त्यातच गुरुवारपासून शासकीय सेवेतील सर्व विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या

रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या होत्या. त्यातून महसुल विभागातील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या आढळणार्‍या रुग्णांमध्ये लक्षणे नसतानाही संक्रमित असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोविडची लागण होवूनही लक्षणांअभावी ते समजत नसल्याने अशी व्यक्ति अनेकांना संक्रमित करणारी वाहक ठरु शकते. अशा रुग्णांचा शोध घेवून त्यांना विलगीकरणात ठेवणे गरजेचे असल्याने, प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर