esakal | ॲड. प्रताप ढाकणे ॲक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमातून होणार सक्रिय
sakal

बोलून बातमी शोधा

Adv Pratap Dhakne

ॲड. प्रताप ढाकणे ॲक्शन मोडमध्ये; मतदारसंघात दौरे केले सुरू

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (जि. नगर) : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणातून काहीसे अलिप्त झालेले केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. कारखान्याचे गाळप यशस्वी करून त्यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. येत्या रविवारी (ता. १८) पाथर्डीत ॲड. ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमातून ढाकणे सक्रिय होत आहेत. (Adv-Pratap-Dhakne-is-active-in-politics-again-ahmednagar-political-news)

स्वतः आजारी असतानाही सुरू केले कोरोना केअर सेंटर

ॲड. ढाकणे यांनी रविवारी (ता. ११) वडगाव, जोगेवाडी, ढाकणवाडी, चिंचपूर पांगूळ व मानेवाडी येथील, कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन करीत ग्रामस्थांशी संवाद साधला. मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत ॲड. ढाकणे यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमात क्वचितच दिसत होते. कोरोना संकटात स्वतः आजारी असतानाही त्यांनी पाथर्डीत सुमन कोरोना केअर सेंटर (Corona care center) सुरू करीत शेकडो बाधितांना आधार देण्याचे काम केले.

हेही वाचा: लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र; लसीकरणाचा सावळा गोंधळ उघडकीस

ढाकणेंच्या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

ॲड. ढाकणे यांना विधानसभा निवडणुकीत सुमारे एक लाख मते मिळाली. पराभव झाला असला, तरी ढाकणेंना मिळालेली मते कमी नाहीत. राष्ट्रवादीच्या ‘शंभर-प्लस’मध्ये विधानसभेच्या संभाव्य जागांत शेवगाव-पाथर्डीचा समावेश आहे. यामुळे ढाकणे पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून, दौरे सुरू केले आहेत. १८ जुलै रोजी पाथर्डीत ॲड. ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ढाकणे यांच्या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे. मतदारसंघाचा दौरा करून ढाकणे जनतेच्या कामासाठी पुन्हा संघर्ष सुरू ठेवणार आहेत.

''जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे आहे. होतील ती विकासकामे करू. नाराजांची नाराजी दूर करू व पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी कामाला लागलो आहे.'' - ॲड. प्रताप ढाकणे, अध्यक्ष, केदारेश्‍वर कारखाना

(Adv-Pratap-Dhakne-is-active-in-politics-again-ahmednagar-political-news)

हेही वाचा: पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; व्हिडीओ एकदा पाहाच

loading image