esakal | Shirdi International Airport: शिर्डी विमानतळावर उड्डाणे होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Shirdi International Airport: शिर्डी विमानतळावर उड्डाणे होणार

Shirdi International Airport: शिर्डी विमानतळावर उड्डाणे होणार

sakal_logo
By
अरुण गव्हाणे

पोहेगाव : दिड वर्षापासुन कोरोनामुळे बंद असलेले काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळ रविवारी १० तारखेपासुन सुरु होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दिली. एप्रिल २०२० मध्ये कोरोनामुळे संपुर्ण देशात लॅकडाऊन करण्यात आले होते. तेव्हा पासुन हे विमानतळ बंद होते.

साई मंदिरही बंद असल्याने साईभक्त शिर्डीकडे येत नव्हते. आता मंदिरेही खुले होणार असल्याने विमान सेवा सुरु होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणची विमानसेवा स्पाईसजेट व इंडीगो एअरलाईन सुरु करणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीवरुन शिर्डी विमानतळावर विमान येणार आहे तर साडेबारा वाजता दिल्लीला जाणार आहे. दुपारी अडीच वाजता हैदराबाद वरुन शिर्डी विमानतळावर विमान येणार आहे. तीन वाजता पुन्हा हैदराबादला जाणार आहे. दुपारी चार वाजता चेन्नई वरुन विमान शिर्डी विमानतळावर येणार असुन साडेचार वाजता पुन्हा चेन्नईला जाणार आहे.

विमानतळ बंद असल्याच्या काळात या ठिकाणी नाईट लॅंडीगची कामे झाली. त्यात काही अडचणी आहेत. कार्गो सेवा सुरु करण्याच्या हालचालीही येथुन सुरु आहेत. मध्यंतरी त्यासाठी अनेक बैठका पार पडल्या. कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या. देशात विमानतळ सुरु झाल्यानंतर सुरुवातीपासुन सर्वाधिक पसंती मिळालेले हे विमानतळ आहे. या ठिकाणी अजुन अत्याधुनिक सुविधा वाढविणे आवश्यक आहे. येथे दृष्यमानतेची अनेक वेळी अडचण निर्माण होत होती.

सर्व विमानसेवा सुरू व्हावी

दृष्यमानतेमुळे मागे अनेक वेळी विमान उड्डाणे रद्द होती. अठरा महिन्यानंतर विमानसेवा सुरु होत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच काकडीतील वाहनधारकांनाही रोजगार सुरु होईल. लवकरात लवकर पुर्वी सुरु असलेली सर्व २८ विमानसेवा या विमानतळावरुन सुरु व्हावी, अशी साईभक्तांची अपेक्षा आहे.

मंदिरेही खुले होणार असल्याने विमान सेवा सुरु होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

- सुशीलकुमार श्रीवास्तव, संचालक विमानतळ, शिर्डी

loading image
go to top