

Pathardi Father Sets Remarkable Example by Donating Kidney to His Daughter
sakal
पाथर्डी: मुलीच्या लग्नावेळी कन्यादान करून तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या पित्याने, तिच्या जीवावर बेतल्यावर किडनी दान करून तिला नवजीवन दिले. पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथील रहिवासी चंद्रकांत भगवान पाचरणे यांनी विवाहित मुलगी निकिता नीलेश वाकचौरे हिला स्वतःची किडनी दान करून पितृत्वाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.