esakal | डोंगर पोखरुन हाती उंदिर..! 10 गावांना 100 पोलिसांचा विळखा, सापडले दोघे
sakal

बोलून बातमी शोधा

police

डोंगर पोखरुन हाती उंदिर..! 10 गावांना 100 पोलिसांचा विळखा, सापडले दोघे

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (जि. नगर) : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने चार वरिष्ठ अधिकारी, अठरा अधिकारी व शंभराहून अधिक पोलिसांनी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५२ जणांच्या झाडाझडतीसाठी शनिशिंगणापूर आणि सोनई पोलिस ठाणे हद्दीतील दहा गावांना विळखा घातला. ही कारवाई म्हणजे डोंगर पोखरून उंदीर निघावा अशीच झाली आहे. (After raiding 10 villages police arrested two accused)

मागील दोन महिन्यांत सोनई व शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चांदे गावात ज्ञानदेव दहातोंडे यांचा खून झाला होता. बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्य संकेत चव्हाण यांच्यावर खुनी हल्ला, तर सोनई व हनुमानवाडीत युवकावर हल्ला झाला होता. या घटनांनी कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. गावठी पिस्तुलाचा वापर करत सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत 'सकाळ'ने वेळोवेळी पाठपुरावा करत बाजू लावून धरली होती.

हेही वाचा: …तर नाशिक, कोपरगावात चिपळूणची पुनरावृत्ती; जलतज्ज्ञ चितळेंच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोनई हद्दीतील ४३, तर शिंगणापूर हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नऊ जणांची झाडाझडती म्हणून विशेष मोहिमेचा आराखडा तयार केला. बुधवारी (ता. २८) मध्यरात्री दोन वाजता सर्व नियोजन झाले. तीन वाजता अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीस अधिकारी व ९० पोलिस कर्मचाऱ्यांनी दहा गावांना वेढा घालत मोहीम राबवली.

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शनी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. बुधवारी रात्री सुरू झालेली मोहीम गुरुवारी दुपारी दोन वाजता संपली. या कारवाईत शाहरुख ऊर्फ चाट्या जावेद शेख (रा. घोडेगाव) याला गावठी पिस्तुलासह अटक केली. करण बाळासाहेब भंडलकर (घोडेगाव) यास एका तलवारीसह अटक केली. पन्नास जणांच्या घरांची झडती घेतली असता, कुठलेही हत्यार सापडले नाही, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी दिली.

(After raiding 10 villages police arrested two accused)

हेही वाचा: पत्नी, चिमुरडा नियतीसमोर हतबल; पित्याचा डोळ्यांदेखत बुडून मृत्यू

loading image
go to top