सात-बारानंतर आता आला आठ अ...महसूलमंत्र्यांनी केला प्रारंभ

आनंद गायकवाड
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग असल्यामुळेच, अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात.

संगमनेर : महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल आठ-अ ऑनलाइन सुविधेस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाइन प्रारंभ करण्यात आला.

या वेळी थोरात म्हणाले, की प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाची शासकीय कामात महत्त्वाची भूमिका असते. महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले.

या पुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील. चार महिन्यांपेक्षा अधिकच्या काळात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा सक्षमपणे काम करीत असल्याचा मला अभिमान वाटतो.

हेही वाचा - सीना धरण भरलंय बरं का तेही भंडारदरा अगोदर

सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग असल्यामुळेच, अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक व्यक्तींनी डिजिटल सात-बारा घेतला आहे. त्याचप्रमाणे आता डिजिटल आठ-अ लाही असाच प्रतिसाद मिळत आहे.

महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन थोरात यांनी केले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After seven-twelve, now there are eight A