esakal | सीना धरण भरले बरं का...प्रथमच भंडारदरापूर्वी मारला नंबर

बोलून बातमी शोधा

For the first time, before the Bhandardara dam, the Sina dam is full

या धरणातून मिरजगाव, निमगावसह सतरा गावे पाणीपुरवठा योजना तसेच श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील पाणी पुरवठा योजना आहे.

सीना धरण भरले बरं का...प्रथमच भंडारदरापूर्वी मारला नंबर
sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : कर्जत, आष्टी, श्रीगोंदा, जामखेड तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या सीना धरणातून गूड न्यजू आहे. सिंचन आणि पिण्याचे पाणी पुरवठा योजनेसाठी उपयुक्त असलेले सीना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सांडव्यातून पाणी नदीपात्रात वाहत आहे. एकोणतीस वर्षात प्रथमच हे धरण इतक्या लवकर भरले.

जिल्ह्यातील निळवंडे, मुळा आणि भंडारदरा धरणाच्या अगोदर हे धरण भरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. मागील काही दिवसांपासून डोंगरगण, नगर तालुका आदी  सीना नदी पाणलोट क्षेत्रात होणा-या दमदार पावसामुळे निमगाव गांगर्डा येथील सीना धरण शंभर टक्के भरले.

हेही वाचा - धक्कादायक ः माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे निधन

सीना धरण इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात भरले. यामुळे येथील लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्याची आवक चांगली आली आहे. तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणाची पाणी साठवण क्षमता 2400 द.ल.घ.फू.अाहे. 

या धरणातून मिरजगाव, निमगावसह सतरा गावे पाणीपुरवठा योजना तसेच श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील पाणी पुरवठा योजना आहे. तसेच टंचाई काळात याच धरणातील पाईप लाईनद्वारे आष्टी, जामखेड व कर्जत तालुक्यातील पाण्याचे शासकीय टँकर भरण्याची मांदळी येथून सुविधा आहे.

यापूर्वी सीना धरणात परतीच्या पावसाच्या पाण्याची आवक आल्याचा इतिहास आहे. सीना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सीना लाभक्षेत्रातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागीॅ लागणार आहे.

सीना धरण जिल्ह्यात इतर धरणांच्या तुलनेत लवकर भरले ही समाधानाची बाब आहे. या वर्षी सर्वांनुमते पाण्याचे टेल टू हेड असे योग्य नियोजन करू.दोन आवर्तन तर होतीलच. मात्र तिसऱ्याची गरज पडल्यास ते ही नियोजन केले जाईल. बुजलेल्या चाऱ्या दुरुस्त केल्या जातील

-रोहित पवार,आमदार कर्जत-जामखेड

 
तालुक्यातील मागील पावसाची आकडेवारी तपासली असता परतीच्या पावसानेच धरणात पाणीसाठा येतो. मात्र, या वर्षी सुरुवातीला ऑगस्टमध्ये धरण भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून सीना नदी पात्राच्या दुतर्फा असलेल्या गावातील ग्रामस्थांनी दक्षता बाळगावी. 

-बाजीराव थोरात, उपविभागीय अधिकारी, सीना प्रकल्प, मिरजगाव

संपादन - अशोक निंबाळकर