
थेरगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
कर्जत (अहमदनगर) : थेरगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, या मागणीचे निवेदन सावता परिषदेतर्फे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनीषा सोनमाळी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.
तालुकाध्यक्ष ज्योती गोरे, शोभा पवार, निर्मला खराडे, दीपाली नेटके, जनाबाई बोराटे, शब्बीर पठाण, अशोक जायभाय, पिंटू बनकर उपस्थित होते. मनीषा सोनमाळी, म्हणाल्या, ""पैठण तालुक्यातील थेरगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असून, त्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.
त्याचप्रमाणे, "बलात्कार करणाऱ्याला 65 दिवसांत शिक्षा व्हावी' या राज्य सरकारने केलेल्या नवीन कायद्यानुसार हा खटला चालवावा, अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. शब्बीर पठाण, अशोक जायभाय यांची भाषणे झाली. प्रास्ताविक ज्योती गोरे यांनी केले, तर निर्मला खराडे यांनी आभार मानले.
संपादन : अशोक मुरुमकर