Kashinath Date: योग्य किमतीत खतांची विक्री करा: काशिनाथ दाते; कृषी केंद्रचालकांच्या बैठकीत सूचना
खतांचे नियोजन व कृषिसेवा केंद्रचालकांना एकात्मिक खत व्यवस्थापन याबाबतच्या नियोजनाविषयी माहिती दिली, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषिसेवा केंद्र तपासणी कामासाठी तालुकास्तरावर गुणनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
Kashinath Date Urges Fertilizer Sellers to Ensure MRP ComplianceSakal
पारनेर : तालुक्यातील कृषिसेवा केंद्रचालकांनी रासायनिक खतांची चढ्या दराने विक्री करू नये., तसेच खतांचे लिंकिंगही करू नये. खतांबरोबरच औषधांची विक्री करतानाही योग्य किमतीतच ती विकावित, असे आवाहन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.