
-संतराम सूळ
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीच्या विकासकामांना गेल्या ३१ वर्षात मिळालेला कोट्यवधीचा निधी ते जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. चौंडीला भेट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून चौंडीत त्या त्या वेळी झालेल्या घोषणा आणि त्याचा याभागात झालेला दुरगामी परिणाम पाहायला मिळाला. आता तर उद्या (ता.६) मंत्रिमंडळाची बैठकच होत आहे.