
अहिल्यानगर : भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधानाचा जागर आता शाळा-महाविद्यालयांतून होणार आहे. संपूर्ण राज्यात त्यानिमित्त विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घर घर संविधान’ हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी नऊ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.