

Ahilyanagar Bank Election Result 2026
Esakal
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून विद्यमान आमदाराचा पराभव तर खासदाराचा विजय झाला. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत ९९.२७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. एकूण ३ हजार ८३७ मतदारांपैकी ३ हजार ८०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.