
अहिल्यानगर: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्हा रुग्णालयात या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांचे वेतनासह इतर प्रश्न अडले आहेत. तरीही ते आरोग्य सेवा देत होते. त्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.