Ahilyanagar Hit by Heavy Rain and Stormy Winds : अहिल्यानगर शहर आणि परिसरात सात वाजता जोरदार वादळी वारे धडकले. या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. काही घरांचे पत्रे उडाले. विजेच्या तारांवर झाडे पडल्याने शहर आणि उपनगरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.
अहिल्यानगर : जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. मेघगर्जनेसह वादळी पावसाला बुधवारी (ता.११) सायंकाळी सुरूवात झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. वादळी वाऱ्या अनेक घरांचे छत उडून गेले.