
अहिल्यानगर : स्वातंत्र्योत्तर काळात कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्याने, तसेच हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांना लाभ झाला. अहिल्यानगर जिल्हा, तर कृषी क्षेत्र तसेच दुधासारख्या जोड धंद्यातही राज्यात अग्रेसर आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, हे ध्येय समोर ठेवून शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजाणीचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.