

Firefighters work to control a blaze at a decoration materials warehouse in Malhar Chowk, Ahilyanagar.
esakal
अहिल्यानगर, : मल्हार चौक परिसरात असलेल्या भुतारे डेकोरेटर्सच्या गोदामाला आज दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने एमआयडीसी व व्हीआरडीईचे अग्निशमन बंब बोलावण्यात आले. तिन्ही दलांनी अथक परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली. फटाके अथवा शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज महापालिकेच्या अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.