सोनई - वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील रहिवासी मानसी हेमंत मोटे हिने बालपणी भारतीय सैन्यदलाचा ड्रेस घालून परेडमध्ये सॅल्यूट करण्याचे स्वप्न पाहिले होते. अथक परिश्रमानंतर तिची देशाच्या हवाईदलात रिमोट पायलट एरियल सिस्टिममध्ये देशातील प्रथम महिला म्हणून निवड झाली आहे.