Police rescue a 15-year-old kidnapping victim from dense jungle near Ramsej Fort in Ahilyanagar district; three accused arrested under POCSO Act.
esakal
अहिल्यानगर
Ahilyanagar Crime : कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन तरुणीचे भर रस्त्यातून अपहरण, घनदाट जंगलात डांबून ५ दिवस लैंगिक अत्याचार, तिघांना अटक
Rahuri Minor Girl Abduction : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे भर रस्त्यातून अपहरण करण्यात आले. मुलगी सकाळी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली होती, मात्र संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही.
अहिल्यानगरमधील राहुरी तालुक्यात एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर घनदाट जंगलात पाच दिवस डांबून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आह. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

