
Ahilyanagar Voter List Program Announced Amid Ward Delimitation Concerns
Sakal
अहिल्यानगर: महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना मुदत संपूनही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. हरकतींवर निर्णय घेऊन सोमवारी (ता. १३) ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणे आवश्यक होते. परंतु मुदतीनंतर तीन दिवस उलटले, तरी प्रभाग रचना प्रसिद्ध झालेली नाही. दरम्यान, प्रभाग रचनेचे गूढ कायम असतानाच मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.