
अहिल्यानगर: महानगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. नदी, महामार्ग, प्रमुख रस्ते, रेल्वे मार्ग, पूल न ओलांडता हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सरासरी २० हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असला, तरी काही ठिकाणी मात्र प्रभागाची लोकसंख्या २२ हजार ४३७ राहणार आहे. त्यामुळे या प्रभागात फिरताना उमेदवारांच्या नाकीनव येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया प्रभागाचा हा आराखडा आज नगरविकास विभागाकडे सादर करणार आहेत.