

Family Murder in Parner Solved in 24 Hours; Accused Arrested with Looted Money
sakal
अहिल्यानगर: भांडगाव (ता. पारनेर) येथे सख्ख्या पुतण्याचा खून करून, तसेच घरातील रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी २४ तासांत मुसक्या आवळल्या. महेश हनुमंत खरमाळे (वय ४५, रा. भुजवळवस्ती, भांडगाव, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दहा लाख २९ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.