
अहिल्यानगर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डांगेगल्ली येथील गुजराती लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर कोतवाली पोलिसांनी सोमवारी (ता. २६) सायंकाळी ५ च्या सुमारास छापा टाकत लॉजचालकासह ७ जणांना ताब्यात घेतले, तसेच या ठिकाणी असलेल्या ३ महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या कुंटणखाण्याचा पर्दाफाश केला आहे.