
अहिल्यानगर : मकरसंक्रांत सणानिमित्त मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते. त्यात अनेक पतंगप्रेमी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करतात. त्यामुळे अनेकजण गंभीर जखमी होतात, तर पशू-पक्षांनाही आपला जीव गमवावा लागतो. ही जीवित हानी टाळण्यासाठी नायलॉन मांजा विक्रेते व हा मांजा बाळगणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.