

Major Blow to Shiv Sena in Ahilyanagar as AB Forms Cancelled
Sakal
अहिल्यानगर: महापालिका निवडणुकीसाठी दाखल ७८८ उमेदवारी अर्जांपैकी १७ अर्ज आज छाननी प्रक्रियेत बाद करण्यात आले. त्यात सर्वाधिक अर्ज शिवसेनेचे बाद झाले आहेत. प्रभाग ८ ‘ड’ मधील शिवसेनेचे उमेदवार राहुल कोतोरे यांचा अर्ज अवैध ठरल्याने त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी उमेदवार कुमारसिंह वाकळे यांचा मार्ग सोपा झाला आहे. शिवसेनेच्या अन्य पाच उमेदवारांचे एबी फॉर्म फेटाळण्यात आल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.