अहिल्यानगरचा देशात डंका! 'स्वच्छ सर्वेक्षणात देशात पाचवा क्रमांक', शहराच्या वैभवात पडली भर

Ahilyanagar Shines Nationally: अहिल्यानगर महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीला अव्वल गुणांकन देण्यात आले आहे. महानगरपालिकेचे सर्व सफाई कामगार, इतर कर्मचारी, अधिकारी व नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
Ahilyanagar Municipal Council receives national recognition for cleanliness – ranked 5th in India in Swachh Survekshan 2025.
Ahilyanagar Municipal Council receives national recognition for cleanliness – ranked 5th in India in Swachh Survekshan 2025.Sakal
Updated on

अहिल्यानगर : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शहरी २०२४ च्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात अहिल्यानगर शहराचा देशात पाचवा, तर राज्यात चौथा क्रमांक आला आहे. जलस्रोत, निवासी व मार्केट परिसर, शौचालयांची स्वच्छता आदींमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीला अव्वल गुणांकन देण्यात आले आहे. महानगरपालिकेचे सर्व सफाई कामगार, इतर कर्मचारी, अधिकारी व नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com