Ahilyanagar: श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार; अध्यक्षांसह सात पदाधिकाऱ्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा

₹2.44 Crore Deposit Fraud Comes to Light: अहिल्यानगरातील श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सुमारे ₹२.४४ कोटींच्या ठेवी परत न केल्याप्रकरणी अध्यक्षांसह सात पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Ahilyanagar

Ahilyanagar

esakal

Updated on

अहिल्यानगर: शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील चाणक्य चौक येथील श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत ठेवदारांनी ठेवलेली मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) व्याजासह परत न करता सुमारे २ कोटी ४४ लाख ४२ हजार ३७७ रुपयांची फसवणूक व गैरव्यवहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अध्यक्षांंसह सात पदाधिकाऱ्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश रामचंद्र पटारे (वय ५४, रा. गुगळे कॉलनी, बुऱ्हाणनगर, ता. नगर) यांनी १६ जुलै रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व इतर ठेवीदारांनी ३ एप्रिल २०२३ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत मुदत ठेव ठेवली होती. सर्व गुंतवणूकदारांची मिळून एकूण २ कोटी ४४ लाख ४२ हजार ३७७ रुपये एवढी रक्कम संस्थेकडे जमा होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com