

Police investigate the fatal car and two-wheeler collision on Ahilyanagar-Solapur Road.
esakal
मिरजगाव, : अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावर बाभूळगाव शिवारात शनिवारी (ता. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. सुदाम मारुती पडोळे, देविदास मारुती पडोळे, श्रेया विशाल पडोळे (वय १०, सर्व रा. केळसांगवी, ता. आष्टी, जि. बीड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे केळसांगवी (ता. आष्टी) गावावर शोककळा पसरली आहे.