

Teacher Vacancies in Ahilyanagar Nilesh Lanke Demands Urgent Recruitment and End to Non Academic Duties for Teachers
sakal
अहिल्यानगर: जिल्हा परिषदेत प्राथमिक आणि माध्यमिक विभागात शिक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. इतर विभागातही रिक्त पदांचा आकडा मोठा आहे. ही पदे तत्काळ भरावीत. शिक्षकांना शालाबाह्य कामांना जुंपले जाते. त्याविरोधात खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषदेत उपोषण सुरू केले आहे. सायंकाळी प्रशासनाने त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, ती निष्फळ ठरली.