
अहिल्यानगर - उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे तिकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात हुडहुडी भरली आहे. तापमानात कमालीची घट झाली असून, राज्यात नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात झाली. राज्यात सर्वाधिक तापमान १९.८ मुंबईत नोंदवले गेले. गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.