Water Management: पाण्याचे नियोजन ठरलेय; आता बदल होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील ,रखडलेल्या पाणी योजनांसाठी ३५० कोटी

Ahilyanagar Water Management : अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचे नियोजन निश्चित झाले असून, पुढील सात महिन्यांत त्यात बदल केला जाणार नाही. सध्या २९७ गावांना ३६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil addresses the media after a drought review meeting in Ahilyanagar.

Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil addresses the media after a drought review meeting in Ahilyanagar.

esakal

Updated on: 

अहिल्यानगर: जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीचे पाणी पुढील सात महिन्यांत कशा पद्धतीने द्यायचे, याचा निर्णय आधीच झाला आहे. त्यामुळे याबाबत कोणत्याही घटकाकडून कितीही मागणी झाली, तरी या नियोजनात बदल केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता.२८) दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री विखे बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठल लंघे, आमदार अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आदी उपस्थित होते.

Loading content, please wait...