
अहिल्यानगर: परदेशातील रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत सेवा सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. वेळ व खर्च वाचणार असल्याने प्रवाशांची चांगली सोय होणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.