
अहिल्यानगर: शहर व परिसरात आज दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी पावसाच्या आगमनामुळे नागरिकांसह शेतकरी सुखावले. दुपारी शाळा सुटण्याच्या वेळीच पाऊस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली. या पावसामुळे कचऱ्याच्या ढिगामुळे काही ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.