

Lahuji-Bhim Shakti members during the Elgar protest in Ahilyanagar demanding justice and equality for the Matang community.
Sakal
अहिल्यानगर: मातंग समाजावरील वाढत्या अन्याय- अत्याचार, तसेच सामाजिक न्याय आणि सुरक्षिततेच्या मागण्यांसाठी लहुजी व भीम शक्तीसह सकल मातंग समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महागर्जना मोर्चा काढला. समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या उद्देशाने हा मोर्चा काढण्यात आला होता.