
-अरुन नवथर
अहिल्यानगर : पोलिसांनी दीड वर्षात तब्बल ८० गावठी पिस्तूल जप्त करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या, तरी शहर व जिल्ह्यातील गोळीबाराचे प्रकार थांबण्यास तयार नाहीत. दोन आठवड्यांपूर्वी एकाच दिवशी जामखेडसह शहरातील तपोवन रोडवर गोळीबार झाला. यावरूनच गावठी पिस्तुलांच्या खरेदी-विक्रीचा बाजार जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते. हा बाजार वेळीच उठला नाही, तर भविष्यात गोळीबाराचे हे सत्र थेट खून करण्यापर्यंत जाईल. त्यामुळे पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांच्या विरोधात कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.