Ahmadnagar News : बाजारपेठेवर आता तिसऱ्या डोळ्याचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmadnagar News

Ahmadnagar News: बाजारपेठेवर आता तिसऱ्या डोळ्याचे लक्ष

मिरजगाव : कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत यांनी वैयक्तिक खर्चातून येथील मुख्य चौक आणि बाजारपेठेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली.आमदार राम शिंदे यांच्या हस्ते या यंत्रणेस आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी मिरजगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उद्योजक उद्धव नेवसे, शिवसेना नेते अमृत लिंगडे, संपत बावडकर,

संजय शेलार, बाळासाहेब निंबोरे, बबन दळवी, सलीम आतार उपस्थित होते. मिरजगावमधील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा क्रांती चौक, जिल्हा परिषद शाळा प्रवेशद्वार, बाजारपेठेतील रस्ता यावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे.

यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न सुटणार असून भरधाव वेगाने वाहने चालविण्याऱ्यांवरही चाप बसणार आहे. प्रशांत बुद्धिवंत यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या यंत्रणेबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

गावातील मुख्य चौक आणि बाजारपेठ आता सीसीटीव्हीच्या नजरेखाली आले आहे. मिरजगाव पोलिस ठाण्याशी ही यंत्रणा जोडल्याने यापुढे कोणतेही गैरकृत्य लपणार नाही. यामुळे टवाळखोरांना आळा बसून गुन्हे नियंत्रित होण्यासाठी मदत होणार आहे.

- प्रशांत बुद्धिवंत, माजी पंचायत समिती उपसभापती