अहमदनगर : एसटीच्या १७१ कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus

अहमदनगर : एसटीच्या १७१ कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

अहमदनगर : गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने आता कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीला निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने, बडतर्फीची कारवाई आता प्रशासनाने सुरू केलेली आहे. आजअखेर एकूण १७१ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: SC/ST चे पदोन्नतीमधील आरक्षण : डेटा गोळा करण्याची जबाबदारी राज्यांची

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही बसस्थानकांमध्ये खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटका आगामी काळात एसटीला बसणार आहे. संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाला सुमारे ४८ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सध्या एसटीचे एकूण तीन हजार ७४३ कर्मचारी आहेत. त्यातील २९० जणांवर निलंबनाची, तर १७१ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई मोहीम अशीच सुरू राहणार आहे. अजूनही जिल्ह्यातील सुमारे ३८ जणांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: अहमदनगर : महावितरणच्या वीजजोड तोडण्याच्या मोहिमेचा जनतेकडून निषेध

गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्या, तरी प्रवाशांचेही हित कर्मचाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे.

१८० बसच्या माध्यमातून ३५० फेऱ्या

जिल्ह्यात सध्या १८० बसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरविली जात आहे. १८० बसच्या माध्यमातून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर दिवसभरात सुमारे ३५० फेऱ्या होत आहेत. त्यातून एसटीला चांगले उत्पन्नही मिळू लागले आहे.

Web Title: Ahmednagar 171 St Employees Lost Job

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top