Ahmednagar : रस्त्यांसाठी ३३ कोटींचा निधी; संग्राम जगताप, हिवाळी अधिवेशनात केली मागणी

शहराचा अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला
Ahmednagar news
Ahmednagar newssakal media

अहमदनगर : शहराचा अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होत आहे. त्यातून शहर विकासाला गती मिळाली आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्प पुरवणी यादीमध्ये शहरातील विविध रस्त्यांसाठी ३३ कोटी ४३ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

Ahmednagar news
Astro Tips : दुसऱ्याची साडेसाती मागे लावून घ्यायची नसेल तर, कधीच कोणाकडून उधार घेऊ नका या गोष्टी

जगताप म्हणाले, की केडगाव लिंक रोड रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. उर्वरित कल्याण महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा पुणे कल्याण रोड महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून यावरील आरसीसी पुलाचे काम देखील मार्गी लागले आहे. त्यामुळे दळण वळणाच्या व शहर विकासाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे, तसेच नगर शहराला जोडणाऱ्या डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी, यासाठी बुरूडगाव साळुंखे मळा ते अहमदनगर महानगरपालिका कचरा डेपोपर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मंजूर असून उर्वरित नेप्ती बायपास पर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Ahmednagar news
Skin Care Tips: पायाला शेविंग करताना अशा चुका टाळा, अन्यथा त्वचेचे होईल भयंकर नुकसान

केडगाव- लोंढे मळा, सोनेवाडी रस्ता बायपासपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नगर शहर मतदार संघातील सीना नदी, ओढे, नाले यावरती पूर्वी पाईप टाकून दगडी पूल तयार करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होत होती. या सर्व पुलाची कामे मार्गी लागावेत, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला असून, त्या कामासाठी सुमारे दोन कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही सर्व कामे आता लवकरच सुरू होणार आहेत, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

नियोजनबद्ध विकासकामे

विकासकामे नियोजनबद्ध व कायमस्वरूपी मार्गी लागावीत, यासाठी दर्जेदार कामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्प पुरवणी यादीमध्ये शहरातील विविध रस्त्यांसाठी ३३ कोटी ४३ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील अत्यंत महत्त्वाचा ओळखला जाणारा रस्ता म्हणजे तारकपूर पत्रकार चौक ते डीएसपी चौकापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये आरसीसी साईट गटार, फूटपाथ, दुभाजक व पथदिवे ही कामे मार्गी लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com