

765 Gram Panchayats In Ahmednagar Set For Faster Administration As ZP CEO Gets New Administrator Appointment Powers
sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यासाठीचे अधिकार राज्य सरकारने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ७६५ ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यांना खर्चाचे अधिकार नसल्याने ग्रामविकासाची कामे अडली होती. आता नव्या प्रशासकाबाबतच्या आदेशाने गावकारभार गतीमान होणार आहे.