अहमदनगर : कुक्कुटपालन फसवणुकीत दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

अहमदनगर : कुक्कुटपालन फसवणुकीत दोघांना अटक

अहमदनगर: शेतकऱ्यांची ५४ लाखांची कुक्कुटपालनात फसवणूक करणाऱ्या अलिबाग (जि. रायगड) येथील एका कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी दीपक रंगनाथ भोर व सुहास किसन महांडुळे (दोघे रा. भोरवाडी, ता. नगर) या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अलिबाग येथील प्रीमीयम चीक फिड्‌स कंपनीची केडगाव (ता. नगर) येथे शाखा आहे. कंपनी पोल्ट्रीचालक शेतकऱ्यांशी करार करून त्यांना ब्रॉयलर कोंबड्यांची पिले, खाद्य आणि औषधे देते. शेतकरी ती पिले वाढवतात व त्या मोबदल्यात त्यांना पिलांच्या वजनावरून पैसे दिले जातात.

या व्यवसायाबाबत संबंधितांशी करार केले जातात. केडगाव शाखेकडून अनिल गुंजाळ, सुहास महांडुळे, रघुनाथ भोर या शेतकऱ्यांना दिलेले पक्षी व खाद्य शेतकऱ्यांनी परस्पर विकले असल्याचे केडगाव येथील शाखा व्यवस्थापक शिवाजी विश्‍वनाथ गायकवाड यांनी कंपनीचे मालक श्याम भालचंद्र ढवण यांना कळविले. त्यानंतर ढवण यांनी लेखापरीक्षक संदेश हिराचंद दांडेकर (रा. मेढेखार, ता. अलिबाग, जि. रायगड) यांना शाखेचे लेखापरीक्षण करण्यास व कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यास सांगितले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

दांडेकर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांत १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून, आणखी सात आरोपी पसार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Arrested Two Poultry Fraud

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top